"शारीरिक आरोग्य जितके महत्त्वाचे, तितकेच मानसिक आरोग्यही!"

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, माणूस यशाच्या मागे धावत असताना अनेकदा स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतो. यामुळे तणाव, नैराश्य, चिंता, आणि एकटेपणासारख्या मानसिक समस्या वाढीस लागतात. मानसिक आरोग्य हे केवळ वेडेपणाशी संबंधित नसून हे आपल्या संपूर्ण जीवनशैलीशी निगडीत आहे.
मानसिक आरोग्य म्हणजे काय?
मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तीच्या विचारसरणी,
भावना, आचरण आणि सामाजिक परस्परसंवादाचे संतुलन. मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती ही..
- स्वतःच्या भावना योग्य प्रकारे समजून घेतो
- समस्या सोडवण्याची क्षमता ठेवतो
- तणावाचे व्यवस्थापन करू शकतो
- नातेसंबंध चांगले राखतो
- समाजात समरसून वागतो
1. आनुवंशिकता
(Genetics)
- काही मानसिक आजार हे कुटुंबात वारसाहक्काने येतात. उदाहरण: स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर.
2. जीवनशैली
- अनियमित झोप
- तणावपूर्ण नोकरी
- अयोग्य आहार
- व्यायामाचा अभाव
3. कौटुंबिक व सामाजिक वातावरण
- लैंगिक, शारीरिक किंवा मानसिक छळ
- एकटेपणा
- सतत उदासी किंवा रडण्याची भावना
- झोपेच्या सवयींमध्ये बदल (फार झोप लागणे किंवा झोप न लागणे)
- अन्नावरून वासना जाणे
- कामात रस न वाटणे
- स्वतःला किंवा इतरांना त्रास देण्याची इच्छा
- चिडचिड, आक्रमकता
- एकटेपणा आणि समाज टाळणे
- स्मरणशक्ती कमजोर होणे
- आत्महत्येचे विचार येणे
भारतातील मानसिक आरोग्याचे वास्तव
- दर 40 सेकंदाला एका व्यक्तीची आत्महत्या होते.
- ग्रामीण भागात मानसिक आरोग्याबाबत माहितीचा अभाव आणि गैरसमज फार मोठ्या प्रमाणावर आहेत.
मानसिक आरोग्यावर उपाय आणि प्रतिबंध
1. स्वतःशी संवाद ठेवा
- दररोज 10 मिनिटं स्वतःशी बोला, भावना लिहून ठेवा.
2. योग आणि ध्यान
- प्राणायाम, अनुलोम-विलोम, ध्यान
- मानसिक शांती व तणाव नियंत्रण
3. पुरेशी झोप
- दररोज 7–8 तास शांत झोप आवश्यक आहे.
4. नियमित व्यायाम
- शारीरिक हालचालमुळे मेंदूत “सेरोटोनिन” वाढतो – जो आनंददायक भावनांसाठी महत्त्वाचा आहे
- वेळेचे योग्य नियोजन
- "ना" म्हणण्याची सवय
- सोशल मीडियाचा वापर मर्यादित करणे
6. समुपदेशन
(Counselling) आणि मानसोपचार
- समस्या गंभीर वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
7. समूहसहवास
- मित्र-मैत्रिणींशी बोलणे, गप्पा मारणे, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेणे
शाळकरी वयातील मानसिक आरोग्य
- अभ्यासाचा ताण
- पालकांची अपेक्षा
- सोशल मीडियाचा प्रभाव
- सतत तुलना
- पालकांनी पाठिंबा द्यावा, समजून घ्यावं
- शाळांमध्ये मानसिक आरोग्य शिक्षण असावे
- मैत्रीपूर्ण शिक्षक-विद्यार्थी संबंध
- ऑफिसमध्ये ताण, डेडलाईनचा दबाव
- घरकाम व करिअर यांच्यातील समतोल
उपाय:
- नियमित ब्रेक
- ऑफिस नंतर वेळ स्वतःसाठी
- गरज असल्यास HR किंवा समुपदेशकाशी बोलावे
- निवृत्तीमुळे एकटेपणा
- कौटुंबिक दुर्लक्ष
- व्याधी आणि चालण्याजोगा त्रास
- नातवंडांबरोबर वेळ घालवणे
- मंदिर/क्लबमध्ये सहभागी होणे
- व्यायाम व ध्यान
मानसिक आरोग्याबद्दल असलेले गैरसमज
गैरसमज सत्य वेडसर लोकांनाच मानसोपचार आवश्यक नाही,
प्रत्येकाला कधी ना कधी मदतीची गरज असते
मानसिक आजार लपवावा योग्य उपचार गरजेचे आहेत
डॉक्टरकडे गेलं म्हणजे पागलपूर्णतः चुकीचं औषधे घेतली की सगळं संपतं
औषधांसोबत समुपदेशन, जीवनशैली बदलही गरजेचे आहेत.
सरकारची भूमिका
- राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP)
- मानसिक आरोग्य कायदा 2017
- रूग्णाच्या हक्कांचे संरक्षण
- गोपनीयतेची हमी
मनोधैर्य योजना (महाराष्ट्रात) – लैंगिक छळ, अत्याचारग्रस्त महिलांसाठी समुपदेशन
No comments:
Post a Comment