भारत सरकारने वाहनचालकांसाठी एक नवी योजना जाहीर केली आहे – FASTag Annual Pass worth ₹3,000. ही योजना मुख्यतः प्रवास सुलभ करणे, टोल वाचवणे आणि कॅशलेस ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
- FASTag वार्षिक पास म्हणजे काय?
FASTag वार्षिक पास हा एक विशेष प्रीपेड पास आहे, ज्यामध्ये ₹3000 च्या मोबदल्यात एक वर्षभरासाठी टोल सवलत किंवा निवडक टोल प्लाझावर मोफत प्रवासाची सुविधा मिळू शकते.
पात्रता (Eligibility)
- ही योजना नॉन-कमर्शियल वैयक्तिक वाहनांसाठी आहे. पात्रता खालीलप्रमाणे:
- तुमच्याकडे निजी (Private) कार/वाहन असावे (टॅक्सी किंवा कमर्शियल गाड्या चालत नाहीत)
- तुमच्या गाडीवर आधीपासूनच सक्रिय FASTag असावा.
- FASTag व्हेईकलच्या विंडशील्डवर चिटकवलेला असावा.
- केवळ एकाच गाडीवर हा पास लागू होतो.
योजना सुरू होण्याची तारीख
- ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे.
पास कसा खरेदी करावा?
मोबाईल अॅप:
- RajmargYatra मोबाईल अॅप वापरून तुम्ही हा पास खरेदी करू शकता.
- अॅपवर लॉगिन करून, वाहनाची माहिती आणि FASTag डिटेल भरून पास खरेदी करता येतो.
वेबसाइट्स:
- NHAI (National Highways Authority of India) ची वेबसाइट
- MoRTH (Ministry of Road Transport and Highways) ची वेबसाइट
या दोन्ही ठिकाणी पाससाठी नोंदणी करून खरेदी करता येते.
किंमत
- पासची किंमत: ₹3,000 वार्षिक
- हा एक फिक्स्ड अमाउंट आहे, ज्यामध्ये विशिष्ट टोल प्लाझा साठी सवलत मिळते.
पासच्या सुविधा व फायदे
- ही योजना केवळ नॉन-कमर्शियल गाड्यांसाठी आहे.
- पासची वैधता एक वर्षभर असते.
- एकदा पास घेतल्यानंतर, त्याचा परतावा मिळणार नाही.
- चुकीची माहिती दिल्यास पास रद्द केला जाऊ शकतो.
FASTag ₹3000 वार्षिक पास योजना ही प्रवासी नागरिकांसाठी एक सुलभ, जलद व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय आहे. वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी ही योजना विशेष उपयुक्त आहे. सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमात यामुळे आणखी एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
योजना भारतभर लागू आहे का?
उपयोग कसा होईल?
कोणत्या टोल प्लाझावर लागू असेल?
- योजना NHAI च्या अधिपत्याखालील टोल प्लाझांवरच लागू असेल.
- सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर FASTag अनिवार्य आहे, त्यामुळे तेथील बहुतांश ठिकाणी हा पास उपयुक्त ठरेल.
- मात्र, काही राज्य महामार्ग, खाजगी रस्ते, किंवा स्थानिक टोल प्लाझा हे राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असल्याने, त्या ठिकाणी ही योजना लागू नसेल.
पास घेतल्यानंतर कसे कळेल की कोणत्या टोलवर लागू आहे?
- RajmargYatra App मध्ये तुम्हाला पास वापरता येणाऱ्या टोल प्लाझांची यादी उपलब्ध असेल.
- तसेच, NHAI च्या वेबसाइटवर सुद्धा यादी पाहता येते.
होय,
FASTag ₹3000 वार्षिक पास संपूर्ण भारतातील राष्ट्रीय महामार्गांवर लागू आहे,
पण राज्य टोल/खाजगी टोल प्लाझावर लागू नसेल.
No comments:
Post a Comment